पुण्यात गंभीर बनतीये ‘कोरोना’स्थिती; ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या रुग्णसंख्येत मोठी वाढ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. पुण्यातही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. पुण्यात कोरोनास्थिती गंभीर बनत आहे. ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. असे असताना पुणे महानगरपालिकेच्या iHeal या अ‍ॅपच्या माध्यमातून मोठा खुलासा झाला आहे.

iHeal या अ‍ॅपच्या माध्यमातून दाखवण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर 2020 ते जानेवारी 2021 या काळात रुग्णांची संख्या कमी होती. मात्र, या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता मोठ्या प्रमाणात वाढली होती. या अ‍ॅपच्या माध्यमातून विविध रुग्णालयांमधील डाटा एकत्र केला जातो. याच माहितीच्या आधारे समजले, की जुलै 2020 मध्ये 16.30 टक्के रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता होती. मात्र, जानेवारी 2021 पर्यंत हा आकडा 64.30 टक्क्यांवर गेला आहे. याशिवाय व्हेंटिलेटरची गरज भासणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली. ऑक्सिजनची गरज न भासणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी झाली आहे.

iHeal चा वापर काय?

पुणे महापालिकेने iHeal हे अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून मुख्यत: विविध रुग्णालयांतील रुग्णांसह गंभीर अवस्थेतील रुग्णांची माहिती घेण्यासाठी बनवण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून रुग्णांच्या औषधांची गरज, लिंगानुसार विभाजन आणि अवस्था याबाबतची माहिती मिळवता येऊ शकते.