Pune Corona | पुणे शहरात रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ, गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 171 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये आज कोरोनाबाधित (Pune Corona) रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आज दुपारी चार वाजेपर्यंत पुण्यात तब्बल 171 नवीन रुग्ण (Pune Corona) आढळून आले आहेत. तर 91 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याने शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे. शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या हजाराच्यावर गेली आहे.

आज विविध तपासणी केंद्रावर 4 हजार 701 संशयितांची तपासणी करण्यात आली असून, यामध्ये 171 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Positive Report) आला आहे. पुणे शहरातील (Pune Corona) सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या 1069 इतकी झाली आहे.
आज दिवसभरात शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत शहरामध्ये 9 हजार 115 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या (PMC) आरोग्य विभागाने (Health Department) दिली आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्ण संख्या 85 इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 57 इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत 38 लाख 45 हजार 409 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे.
यापैकी 5 लाख 09 हजार 276 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी 4 लाख 99 हजार 092 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

Web Title : Pune Corona | large number of patients increases in Pune city,
171 patients diagnosed with Corona in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या

कमजोरी दूर करण्याचे ‘हे’ ९ घरगुती उपाय, शरीर होईल ‘ताकदवान’, जाणून घ्या

तब्बल ३०० रोगांवर शेवगा ‘गुणकारी’ ! जाणून घ्या खास घरगुती उपाय

Maharashtra Police |  पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ

PM Narendra Modi | मुलांना कोणती व्हॅक्सीन दिली जाणार, रजिस्ट्रेशन कसे होणार? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

 

Anti Corruption Bureau Pune | पुण्यात वॉरंट रद्द करण्यासाठी 2 हजाराची लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात