लासलगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पडले मोठे खड्डे; वाहन धारकांना करावी लागते कसरत

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – लासलगाव येथील शिवाजी चौकामधील मध्यवर्ती ठिकाणी मोठे खड्डे पडले असून वाहनचालकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून रस्त्याच्या मधोमध खड्डे पडले असून ग्रामपालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सदरचे खड्डे बुजवावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे

येथील बाजारपेठकडून जाणाऱ्या झेंडा चौकाजवळ दीड बाय दिड चे खड्डे पडले असून या खड्यामुळे अपघात होत आहे रात्री अंधाराच्या वेळेत सदरचे खड्डे दिसत नसल्याने वाहनांची चाके या खड्यात अडकून अपघात होत आहे.गेल्या १५ दिवसांपासून सदरचा खड्डा पडलेला असून ग्रामपालिकेने याकडे लक्ष देवून किमान खड्डा तरी बुजवावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहे