केडगावमध्ये मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू, प्रशासकीय यंत्रणा मात्र मूग गिळून गप्प

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – वाळूचा अधिकृत लिलाव झाला नसला तरी दौंड तालुक्यातील केडगाव परिसरामध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर चोरट्या पद्धतीने जेसीबी मशीनने वाळू उपसा करून ती वाळू शेकडो ट्रकमध्ये भरुन पुण्याकडे पाठवली जात आहे. केडगाव परिसरामध्ये सध्या अनेक वाळू माफियांनी डेरा टाकला असून या माफियांवर महसूल, पोलिस प्रशासनाचा वचक नसल्याने वाळू तस्करांची मुजोरी आणि गुंडगिरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

केडगाव परिसरातील देशमुख मळा, बोरीपार्धी परिसरातील नेवसे मळा या ठिकाणी शेतजमीन आणि ओढ्यांमधून राजरोसपणे चोरून वाळू उपसा होत आहे काही महिन्यांतच वाळूचोरीचा आकडा हा लाखांवरून कोटींच्या घरात गेल्याने शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत आहे. वाळू माफियांच्या दहशत आणि अरेरावीने स्थानिक नागरिक मोठ्या दडपणाखाली आहेत. केडगाव परिसरामध्ये या वाळू चोरांना काही राजकीय मंडळी पाठिशी घालत असून देशमुख मळा येथे होत असलेल्या वाळू उपश्यामागे एका राजकीय पुढाऱ्याच्या मोठा हात आहे.

महसूलचे कर्मचारी वाळू चोरी होत असलेल्या ठिकाणी गेल्यानंतर तेथे हा राजकीय पुढारी त्यांना अगोदर पैशाने मॅनेज करायला पाहतो जर कर्मचाऱ्यांनी ऐकले नाही तर वरिष्ठांची ओळख सांगून तो दमदाटी करत त्यांना तेथून कारवाई न करता निघून जाण्यास भाग पाडतो अशी माहिती एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितली आहे. त्यामुळे शासनाचा महसूल आणि वाळू चोरीचे काळे धंदे केवळ या राजकीय पुढाऱ्याच्या आशीर्वादानेच या परिसरामध्ये सुरू असल्याचे येथील स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा आहे.

राजकीय पुढारी आणि वाळू माफिया यांचा बंदोबस्त महसूल आणि पोलीस यंत्रणा कसा करते आणि प्रशासन त्यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दिवसा ढवळ्या होत असलेल्या वाळू उपशामुळे येथील रस्ते उखडले असून नागरिकांनी याबाबत आवाज उठविण्याचा प्रयत्न केला तर त्यांना धमकावून गप्पा बसविण्यात येत असल्याचेही प्रकार घडत आहेत वाळू माफियांचा दहशतीमुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले असून पोलिस व महसूल प्रशास निद्रावस्थेमध्ये गेल्याने वाळू माफिया आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आरोग्यविषयक बातम्या

खुशखबर ! निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत

‘हे’ आहेत दही खाण्याचे फायदे

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय