देशातील सर्वात मोठा FIR ! ४ दिवसांपासून लिहीत आहेत पोलीस, लागणार अजून ३ दिवस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतातील इतिहासातील सर्वात मोठी FIR उत्तराखंडच्या काशीपूर कोतवालीमध्ये लिहली जात आहे. अहवाल लिहिताना चार दिवस उलटून गेले, पण अद्याप ते काम पूर्ण झाले नाही. हे पूर्ण करण्यास दोन ते तीन दिवस लागू शकतात असे सांगण्यात येत आहे. ही बाब अटल आयुष्मान योजनेशी संबंधित आहे. या घोटाळ्यात सामील झालेल्या दोन मोठ्या रुग्णालयांविरूद्ध पोलिस एफआयआर नोंदवित आहेत. ही एफआयआर पोलिसांसाठीही डोकेदुखी बनली आहे. हिंदी व इंग्रजीमध्ये असलेली ही एफआयआर लिहिण्याच्या कामात पोलिसांना घाम गाळावा लागत आहे.वास्तविक, पोलिस एफआयआर टायपिंग सॉफ्टवेअरची क्षमता १० हजार शब्दांपेक्षा जास्त नाही, म्हणूनच पोलिस हा एफआयआर हाताने लिहित आहेत.

बनावट उपचार बिलाचा दावा :
अटल आयुष्मान योजनेंतर्गत रामनगर रोड येथील एमपी हॉस्पिटल आणि तहसील रोड येथील देवकी नंदन रुग्णालयात आरोग्य विभागाच्या पथकाला प्रचंड अनियमितता आढळली होती. या तपासणीत नियमांविरूद्ध रूग्णांच्या बनावट ट्रीटमेंट बिलाचे दावे गोळा करण्याचे प्रकरण आढळून आल्याने दोन्ही रुग्णालयांच्या संचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

रुग्णांचे डिस्चार्ज झाल्यानंतरही बिल मीटर चालू :
एमपी रुग्णालयात रूग्णांना सोडण्यात आल्यानंतरही अनेक दिवस रूग्णालयात रूग्णावर उपचार सुरू असल्याचे दाखवण्यात आले होते. आयसीयूमध्ये क्षमतेपेक्षा जास्त असलेल्या रूग्णांवर उपचार दर्शविले गेले. डायलिसिस प्रकरण एमबीबीएस डॉक्टरांद्वारे केल्याचे सांगण्यात आले आणि ते रुग्ण देखील रुग्णालयाच्या क्षमतेपेक्षा अनेक पटींनी वाढले. बर्‍याच प्रकरणांमध्ये उपचार न करताच खर्च दाखवला गेलाय, ज्याची रूग्णलाही माहिती नाही.

कारवाईतही समस्या :
उत्तराखंड अटल आयुष्मानचे कार्यकारी सहाय्यक धनेश चंद्र यांच्या वतीने पोलिसांना रुग्णालयातील दोन्ही संचालकांविरोधात तक्रार देण्यात आली. यापैकी एक तक्रार ६४ तर दुसरी सुमारे २४ पानांची आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर माहिती असल्यामुळे या रुग्णालय संचालकांवर ऑनलाईन एफआयआर दाखल करता येणार नाही असे पोलिसांनी सांगितले.

कोतवालीमध्ये एफआयआर नोंदवणाऱ्या सॉफ्टवेअरची क्षमता १० हजार शब्दांपेक्षा जास्त नाही, यामुळे पोलिसांचा घाम निघत आहे. एफआयआर दाखल करण्यास दिरंगाईबाबत वरिष्ठ पोलिस अधिका्याने एफआयआर २ दिवसात लिहून पूर्ण करण्याचा इशारा दिला आहे.

या एफआयआरमध्ये केवळ लेखन मर्यादित नाही. जेव्हा पोलिस अशा मोठ्या एफआयआरची चौकशी करतात तेव्हा किमान एक कारवाई करण्यास १५ दिवस लागू शकतात, तर तपासणीची अंतिम मुदत ३ महिन्यांपर्यंत ठेवली गेली आहे जी कोणत्याही परिस्तितीत पूर्ण होऊ शकत नाही. पोलिसांसमोर पहिले आव्हान आहे की ते नोंदवून घेणे आणि मग त्यावर कारवाई करणे, हे दोन्हीही सोपे नाही.