धक्कादायक ! नागपूरच्या ‘या’ पंचतारांकित हॉटेलच्या नाश्त्यात आढळल्या अळ्या  

नागपूर:पोलीसनामा ऑनलाईन- मुंबईतल्या ३२७ हॉटेलांना काही दिवसांपूर्वी त्यांच्या अन्नाचा दर्जा सुधारण्याबद्दल अन्न व औषध प्रशासनाने नोटीस बजावली असतानाच .नागपूरमधील प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलच्या नाश्त्यात अळ्या आढळून आल्याची  खळबळजनक घटना घडली आहे .रेडिसन ब्ल्यू या सुप्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमध्ये इडली सांबरमध्ये अळी आढळल्याचा प्रकार समोर आला आहे.
विशेष म्हणजे ‘झुंड’ चित्रपटाच्या शूटिंग साठी नागपुरात आलेले अमिताभ बच्चन आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे हे दोघे सुद्धा  याच पंचतारांकित हॉटेल मध्ये थांबले आहे. १४आणि१५ डिसेंबर रोजी आयपीसीए फार्मा या कंपनीची या हॉटेलमध्ये मीटिंग होती. त्यावेळी देण्यात आलेल्या नाश्त्यामध्ये अळ्या आढळल्याने फार्मा कंपनीने हॉटेल प्रशासनाला कळविले होते.
पहिल्या  दिवशी  कळवले असतानाही परत आढळल्या अळ्या
परंतु दुसऱ्या दिवशीही तोच प्रकार घडल्याचे निदर्शनास आल्यानंतर युवासेनेने काल एफडीएकडे तक्रार दिली आहे. काल रात्री एफडीएच्या चमूने हॉटेलमध्ये जाऊन चौकशी करत तिथल्या खाद्यपदार्थाचे नमुने घेतले आहेत. आता या प्रकरणी काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  एफडीएचा अहवाल आल्यानंतर यातील सत्यता समोर येणार आहे.
You might also like