सावधान ! अहमदनगरमध्ये पाणीपुरीच्या पाण्यात अळ्या आढळल्याने सर्वत्र ‘खळबळ’ (व्हिडीओ)

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील नेप्ती नाक्यावरील चौकात पाणीपुरीच्या पाण्यात चक्क अळ्या आढळून आल्या आहेत. शहरातील हातगाडी व्यावसायिकांची महापालिका आरोग्य विभाग व अन्न व औषध प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची तपासणी होत नाही. त्यामुळेच आता नागरिकांनीच सावध राहण्याची वेळ आली आहे.

नेप्ती नाका येथे काही नागरिक हातगाडीवर पाणीपुरी खाण्यासाठी गेले होते. त्यावेळी पुरीतील पाण्यात एका ग्राहकाला अळ्या आढळून आल्या. हा प्रकार लक्षात येताच ग्राहकांनी पाणीपुरीवाल्याला पाणी फेकून देण्यास भाग पाडले. शहरात अनेक पाणीपुरीच्या गाड्या असून, रस्त्यावरच पाणीपुरीची विक्री केली जाते. मात्र त्यांची स्वच्छता व पाणी उपलब्धतेबाबत कधीही कोणी पाहत नसल्याने अशा लोकांचं नेहमीच फावत आहे.

नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या हातगाडी चालकांविरुद्ध कुणीही कारवाई करताना दिसत नाही. महानगरपालिकेचा आरोग्य विभाग अथवा अन्न औषध प्रशासन यांनी कधीही अशा गाड्यांची तपासणी केली अथवा कारवाई केल्याचे ऐकवित नाही. त्यामुळे असे घाणेरडे पाणी नागरिकांना देण्याची हिंमत विक्रेत्यांची वाढत चालली आहे.

नेप्ती नाक्यावरील चौकात अळ्या आढळल्यानंतर तेथील पाणीपुरीवाल्याने आपले पाणी फेकून देत आपली चूक असल्याचे कबूल केले. मात्र असे अनेक पाणीपुरीवाले दररोज नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहेत. मात्र झोपलेला महापालिकेचा आरोग्य विभाग व अन्न औषध प्रशासन नेमकं काय करते,
असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –