लासलगाव : थेटाळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात 14 शेळ्या ठार

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – येथुन पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या थेटाळे येथील राजाराम तुळशीराम शेवरे यांच्या गोटफार्मवर काल रात्री मध्यरात्री नंतर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मोठ्या पाच तर लहान नऊ अशा चौदा शेळ्या ठारमारल्या असुन नऊ शेळ्या जखमी झाल्या आहेत अशी माहीती विंचुर येथील वनसंरक्षक सुनील महाले यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की थेटाळे येथील शाहु दगु शिंदे यांच्या गट नंबर 57/2 मधील शेतात राजाराम तुळशीराम शेवरे यांच्या गोटफार्मवर काल रात्री मध्यरात्री नंतर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर जनावरांच्या प्राणावर बेतले. याबाबत बाजार समितीचे प्रशासनाकडुन लेखी अहवाल येताच नुकसानीचा आकडा हाती येईल असे वनसंरक्षक सुनील महाले यांनी सांगितले.

दरम्यान जि. प. सदस्य डी. के. जगताप व लासलगाव बाजार समिती सभापती सौ. सुवर्णा जगताप यांनी घटनास्थळी दाखल होऊन भेट दिली. लासलगावचे पोलिस कर्मचारी राजाराम अहिरे व प्रदिप आजगे यांनीही भेट दिली