लासलगाव : पुन्हा २ रुग्ण ‘कोरोना’ बाधित

लासलगाव : मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार लासलगाव येथे पुन्हा २ रुग्ण करोना पॉझिटिव्ह सापडले असून त्यात ३४ वर्षीय खाजगी डॉक्टर व २१ वर्षीय युवकाचा समावेश आहे त्याच प्रमाणे लासलगाव जवळील सोमठाण देश येथील ५३ वर्षीय पुरुष कोरोना बाधित असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ चेतन काळे यांनी दिली

लासलगाव येथील नुकत्याच कोरोना बाधित आढळलेल्या महिलेच्या संपर्कात आलेल्या खाजगी ३४ वर्षीय डॉक्टरचा तसेच २१ वर्षीय युवकाचे पिंपळगाव बसवंत कोविंड सेंटर येथून घशाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.हे अहवाल दिनांक ३० जून रोजी रात्री उशिरा प्राप्त झाले असून या मध्ये लासलगाव चे दोन्ही रुग्ण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे

लासलगाव शहरात आता पर्यंत एकूण सात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून त्या पैकी चार रुग्ण कोरोना मुक्त होऊन त्यांची घरवापसी झाली आहे.नाशिक जिल्ह्यात सर्वत्र कोरोना चे रुग्ण मोठया प्रमाणात आढळत असून या करोनाने निफाड तालुक्यात शिरकाव केलेला असल्यामुळे चिंतेत भर पडत आहे.लासलगाव मध्ये पुन्हा कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.मात्र प्रशासना तर्फे भीती न बाळगता काळजी घेण्याचे आव्हान करण्यात आले