लासलगाव : 9 बाधित रूग्णांची ‘कोरोना’वर मात

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – येथील कोविड सेंटरमध्ये कोरोनावर उपचार घेत असलेले ९ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोना मात केल्याने आज डिस्चार्ज देण्यात आला.

यात लासलगाव येथील एक रुग्ण,विंचूर चे तीन रुग्ण,पिंपळगाव बसवंत चे दोन रुग्ण,कसबे सुकेने चे दोन रुग्ण आणि ओझर येथील एक रुग्ण असे मिळवून ९ रुग्णांवर यशस्वी उपचार करून या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती कोविड सेंटर प्रमुख डॉ राजाराम शेंद्रे यांनी दिली. या नऊ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने घरवापसी केली आहे ही बाब दिलासा देणारी ठरली आहे.

या नऊ रुग्णांना डिस्चार्ज देताना डॉक्टर,परिचारिका आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी पुष्पवृष्टी करत टाळ्याच्या गजरात अभिनंदन केले.या कोविड सेंटरमधून गेल्या दोन महिन्यात आजपर्यंत ८५ रुग्णांनी कोरोनावर मात करत घरवापसी केली असून ३० रुग्ण अद्याप उपचार घेत असल्याचे कोविड सेंटरचे प्रमुख डॉ राजाराम शेंद्रे यांनी सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like