लासलगाव : COVID सेंटरमधून ९ जण ‘कोरोना’मुक्त

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन –   येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये कोरोनावर उपचार घेत असलेले निफाड तालुक्यातील तीन गावातील 9 कोरोना बाधित रुग्णांनी कोरोना मात केल्याने आज डिस्चार्ज देण्यात आले

निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील चार ,विंचूर येथील चार तर निमगाव वाकडा येथील एक असे नऊ कोरोना बाधित रुग्ण लासलगाव ग्रामीण रुग्णालयात येथील कोविड सेंटरमध्ये कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने उपचार घेत होते आज या नऊ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने घरवापसी केली आहे ही बाब दिलासा देणारी ठरली आहे या नऊ रुग्णांना डिस्चार्ज देताना डॉक्टर परिचारिका आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी पुष्पवृष्टी करत टाळ्या गजरात अभिनंदन केले या कोविड सेंटरमधून गेल्या दोन महिन्यात आजपर्यंत 60 रुग्णांनी कोरोनावर मात करत घरवापसी केली असून 22 रुग्ण अद्याप उपचार घेत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी राजाराम शेंद्रे यांनी दिली.