लासलगाव : कांद्याने भरलेल्या ट्रकची दुचाकीला धडक, दोन ठार

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – लासलगाव (Lasalgaon) ते चांदवड रोडवर टाकळी विंचूर शिवारात मधुकर गायकर यांच्या पेट्रोल पंपासमोर लासलगाव कडून चांदवडकडे जाणार्‍या कांद्याने भरलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू (Death) झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की लासलगाव (Lasalgaon) कडून चांदवडकडे जाणारा कांद्याने भरलेल्या ट्रकने (नंबर टी एन २९ बीके ६७७२) चांदवड बाजूकडून लासलगावकडे निघालेल्या बजाज कावसाकी मोटरसायकलला (नंबर एम एच १५ एटी २७५०) पेट्रोल पंपासमोर धडक दिली. मोटारसायकलस्वार अण्णा विष्णू शिंदे (वय ६५, रा. साळसाने तालुका चांदवड) व निवृत्ती लक्ष्मण गाडे (रा. तळेगाव, तालुका चांदवड) यांना मोटर अपघातात (Accident) जबर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी कृष्णाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल लासलगाव येथे ॲम्बुलन्स ने पाठवले. डॉक्टरांनी दोघांना मयत घोषित केले.

 

अपघाताची खबर जिल्हा परिषद सदस्य शिवा सुरसे (Zilla Parishad Member Shiva Surase) यांनी पोलीस स्टेशनला दिली. पोलीस उपनिरीक्षक आर एस सोनवणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देविदास विश्वनाथ लाड, पोलीस नाईक संदीप शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश जामदार, होमगार्ड डी एम गुरव, मालेगाव पथक घटनास्थळी गेले. अपघात (Accident) करून ट्रक ड्रायव्हर पळून गेला असता त्यास पोलिसांनी व ग्रामस्थांनी दिघवत या ठिकाणाहून ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात मयताचे नातेवाईक यांनी मोटार अपघाता संदर्भात लासलगाव (Lasalgaon) पोलीस स्टेशनला गुन्हा (FIR) दाखल केला असून , सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर एस सोनवणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देविदास विश्वनाथ लाड करीत आहेत.

Wab Title :- Lasalgaon: A truck loaded with onions hit a two-wheeler, killing two

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pan Card Online Application | डॉक्युमेंटची गरज नाही, फक्त 10 मिनिटांत बनवा Pan Card, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

सिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी Adani Cement

येथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख रुपये; 50 लाखांची ‘ही’ सुविधा सुद्धा Free

Coronavirus : भारतातील कोरोना मृत्यूंचा आकडा चुकीचा, प्रत्यक्षात 7 पट जास्त मृत्यू? सरकारने मॅग्झीनचा दावा फेटाळला

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा