Lasalgaon : 4 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर कांदा लिलाव सुरळीत

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव सुरळीत झाले आज उन्हाळ कांद्याला सरासरी ५१०० रुपये तर जास्तीत जास्त ५९०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.

गेल्या चार दिवसांपासून कांदा साठवणुकीवर टाकलेल्या निर्बंध वरून व्यापारी वर्गाने लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यास असमर्थता दर्शवली होती त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये शेतकरीवर्ग चिंतेत पडला होता काल सायंकाळी लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलावाचा तिढा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषी राज्यमंत्री दादा भुसे आणि व्यापारीवर्ग यांच्यात झालेल्या बैठकीत सुटल्याने शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला.

You might also like