लासलगाव : 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रतीक आहेरचे घवघवीत यश

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन (राकेश बोरा) – येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे ज्युनिअर कॉलेजच्या 12वी कला शाखेत शिक्षण घेणारा प्रतीक बाबाजी आहेर याने शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे.

प्रतीक ने तालुकास्तरावर शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला त्यानंतर जिल्हास्तरीय स्पर्धेत नाशिक येथे झालेल्या स्पर्धेत त्याने तिसरा क्रमांक पटकावला.

त्याच्या या कामगिरीबद्दल त्याचा यथोचित सत्कार नाशिक शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.

त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय होळकर सरचिटणीस गोविंदराव होळकर कोषाध्यक्ष अनिल डागा प्रकाश पाटील चंद्रशेखर होळकर योगेश पाटील संदीप होळकर सचिन मालपाणी चंद्रशेखर भावसार हस्मुख पटेल प्राचार्य डॉक्टर दिनेश नाईक यांनी त्याचे अभिनंदन केले क्रीडाशिक्षक गणेश जाधव यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.

प्रतीक आहेर याचा सत्कार करताना नाशिक शहराचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/