लासलगाव : परतीच्या पावसाची जोरदार हजेरी, शेतीपिके सडण्याच्या भीतीने बळीराजा चिंताग्रस्त

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – यंदाच्या मोसमात माघारीच्या वाटेवर असलेल्या मान्सूनच्या पावसाने लासलगावसह परिसरातील गावात एक तासहून अधिक वेळ जोरदार हजेरी लावली लासलगाव बाजार समितीत पाऊस मापक यंत्रावर 22 मिमी पावसाची नोंद झाली आहे या पावसाने पंधरा दिवसानंतर हजेरी लावल्याने ऑक्टोबर हिटमुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला

यंदाच्या पावसाळी हंगामात सरासरी पेक्षा हि जास्त पाऊस झाला आजपर्यंत 32 इंच पावसाची नोंद लासलगाव बाजार समिती असलेल्या पाऊस मापक यंत्रावर झाली आहे या जास्त पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेती पिके कसे वाचवावे या विवंचनेत असलेल्या बळीराजाला परतीच्या पावसाने जोरदार दणका दिल्यामुळे शेतात उभे असलेले कांदा, मका, सोयाबीन, बाजारीसह शेती पिके सडण्याच्या भीतीमुळे कुटुंबाचे उदरनिर्वाह कसे करावे व कर्ज कसे फेडावे असा प्रश्न आता उभा राहिला आहे