लासलगाव : खडक माळेगाव स्मशानभूमीत निवारा शेड कामाचे भूमिपूजन

लासलगाव  : पोलीसनामा ऑनलाइन –   खडक माळेगाव(Khadak Malegaon) येथे मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत निफाड पंचायत समितीचे माजी सभापती तथा विद्यमान सदस्य शिवा पाटील सुराशे(Shiva Patil Surashe) यांच्या प्रयत्नातून दहा लक्ष रुपये निवारा शेडच्या कामाचा शुभारंभ शिवा सुरासे यांच्या हस्ते व सरपंच तेजलताई रायते, उपसरपंच संजय रायते यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. अनेक दिवसांपासून स्मशानभूमीत निवारा शेड बैठक व्यवस्था करण्यात यावी, अशी खडक माळेगावकरांची मागणी हाेती. खडक माळेगाव(Khadak Malegaon) गणाचे पंचायत समिती सदस्य शिवा पाटील सुराशे(Shiva Patil Surashe) यांनी मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत स्मशानभूमी आनुषंगिक निवारा शेडचे काम मंजूर केले व त्याचे भूमिपूजन आज करण्यात आले.

गेल्या चार वर्षांत खडकमाळेगाव गणांमध्ये तसेच खडक माळेगाव गावामध्ये कोट्यवधी रुपयांची विकासकामे आणू शकलो तसेच सर्वसामान्य माणसाचे काम करू शकलो याचं समाधान आहे. नागरी सुविधा, मूलभूत सुविधा, जनसुविधा, पाणीपुरवठा, अल्पसंख्याक दलित वस्ती सुधारणा, आदिवासी वस्ती सुधारणा, आरोग्य शिक्षण या सर्वच कामांसाठी निधी उपलब्ध करू शकलो, याच एकमेव कारण राज्य सरकार ते ग्रामपंचायत एक सरकार असल्यामुळे राज्य सरकार जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या संस्था ताब्यात असल्याने काम आणण्यासाठी कोणती अडचण निर्माण होत नाही.

टाकळी विंचूर एक कोटी 70 लाख, खडक माळेगाव 1 कोटी 80 लाख, सारोळे खुर्द 1 कोटी 18 लाख, ब्राह्मणगाव वनस 98 लाख, थेटाळे 55 लाख रुपये राष्ट्रीय पेयजल योजनेतून या कामांना मंजुरी मिळाली असून, राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील कृषिमंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री छगन भुजबळ त्यांचे सहकार्य या कामासाठी लाभले असून, उर्वरित काळात मध्ये गणातील गावांसाठी बरीच कामे प्रस्तावित असून, ती करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन शिवा सुरासे यांनी कार्यक्रमप्रसंगी आपल्या मनोगतातून दिले.

या प्रसंगी दत्ता काका रायते, भागीरथ रायते, माजी संचालक रावसाहेब रायते, नामदेव रायते, उपसरपंच संजय रायते, ज्ञानेश्वर शिंदे, राजेंद्र रायते, पंढरीनाथ रायते, अरुण शिंदे, नारायण राजोळे, शरद रायते, कासम शेख, अझर मणियार, ग्रामसेवक बेंडके यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.