छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जैन प्राथमिक शाळेत उत्साहात साजरी

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – जैन प्राथमिक शिक्षण मंदिर लासलगाव शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. शाळेतील विद्यार्थी रुद्रा गांगुर्डे हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत तर इतर विद्यार्थी राजमाता जिजाऊ, राणी सईबाई, मावळे, आदि यांच्या वेशभूषेत येऊन शाळेतील विद्यार्थ्यांनी आनंद घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी शिंदे यांनी भूषविले.

शाळेतील विद्यार्थ्यांनी तसेच वर्धमान बालक मंदिर मधील विद्यार्थ्यांनी भाषणे, पोवाडे, गीते सादर केले. संस्थेचे कार्याध्यक्ष जव्हेरीलाल ब्रम्हेचा, मानद सचिव शांतीलाल जैन, महावीर शाळेचे अध्यक्ष सुनील आब्बड, जैन प्राथमिक शाळेचे अध्यक्ष महावीर चोपडा, विश्वस्त मोहनलाल बरडीया, अमित जैन यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळेचे विभाग प्रमुख गणेश महाले तसेच शिक्षक पवार सर यांनी नियोजन तसेच सूत्र संचलन केले.

शाळेतील शिक्षक गणेश महाले, लिनीता आहिरे,मनीषा पाटील, तुषार जैन, महेश खैरनार, उमेश कापडणीस, सतिश गाडे, विलास पवार, नवनाथ ठाकरे, किरण पाचपुते, नरेंद्र हांडगे, भारती पवार, पल्लवी दवते, जयश्री बाविस्कर, सुरेखा आहिरे, छाया चव्हाण, स्वाती सोनवणे, अर्चना वडणेरे आदिंनी कार्यक्रम पार पाडला. व कार्यक्रमासाठी पालकवर्ग ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like