PM-Kisan योजनेचे गैर लाभ घेतल्याची नोटीस बजावल्याचा राग आल्याने कोतवालास शिवीगाळ

लासलगाव, पोलीसनामा ऑनलाइन – शासनाच्या पीएम किसान योजनेचे लाभार्थी म्हणुन आयकरपात्र निघाल्याने बारा हजार रूपये मागणीची नोटीस दिल्याचे कारणावरून निफाड तालुक्यातील कानळद येथील कोतवाल अमोल बाजीराव चिताळकर यांना नारायण श्रीपत जाधव रा. कानळद यांनी मोबाईलरून शिवीगाळ केल्याप्रकरणी लासलगाव पोलिस कार्यालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शासनाने पीएम किसान योजनेचे लाभार्थी असलेले आयकर भरत असल्यास त्यांना खात्यावर अदा केलेली रक्कम परत करण्याची नोटीसा देण्याचे शासनाने आदेश दिले असुन याबाबत निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे यांना निफाड येथील स्टेट बॅकेत खाते उघडण्यात आले असुन निफाड तालुक्यातील शासनाने अदा केलेल्या रक्कमेची वसुली करण्याच्या नोटीसा तहसीलदार शरद घोरपडे यांचे आदेशाने गावस्तरावर सुरू आहे.

कानळद येथील कोतवाल अमोल बाळासाहेब चिताळकर यांनी 8329989101या मोबाईल क्रमांकावरून कानळदचे नारायण श्रीपत जाधव हे आयकर पात्र असल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे बारा हजार रूपये रक्कम मागणी करणारी नोटीस त्यांचा मुलगा सतीष जाधव यांना पाठवली.त्याचा राग येऊन रवीवारी दुपारी 4.11 वाजता कोतवाल यांचे मोबाईलवर नारायण जाधव यांनी 992233657 यावरून नोटीस का दिली या कारणावरून भ्रमणध्वनीवर शिविगाळ केली. आज निफाड तालुक्यातील मौजे कानळद येथील सजाचे कोतवाल श्री अमोल चितळकर यांनी फिर्याद देताच पोलिसांनी भादवि कलम 506 व 507 नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास लासलगाव चे सहाय्यक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार ठोंबरे करीत आहेत