लासलगाव : ‘कोरोना’मुक्त झालेल्या 5 जणांना निरोप

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन  – लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार केंद्रात आज बरे झालेल्या पाच रुग्णांना टाळ्या वाजवुन गुलाब पुष्प देऊन निरोप देण्यात आला.

यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळकृष्ण अहिरे डॉ अविनाश पाटील डाॅ.विद्या अहिरे डॉ. शुभांगी भारती, डॉ. मगर डॉ. ढेपले डॉ. सारंग मराठे, डाॅ. वैभव देवरे मुख्य पारिचारिका श्रीमती जाधव , सौ पाटेकर, सौ कोळी, सौ दिवेकर, औषध विभाग प्रमुख अंकुश काळे, दिलीप जेऊघाले, रमेश तुनपुरे, ज्ञानेश्वर शिंदे ,दत्तू शिंदे, राजू जाधव ,गणेश भवर , कापसे ड्रायव्हर, संतोष माठा उपस्थित होते .

कोरोना प्रादुर्भाव वाढल्यानंतर लासलगाव येथील कोरडा उपचार केंद्र परत कार्यान्वित करण्यात आले असून आत्तापर्यंत 162 रूग्णांवर यशस्वीरित्या उपचार करण्यात आला यापैकी एकशे तीन रुग्ण बरे झाले असून सध्या पस्तीस कोरोना पाॅझीटीव्ह रूग्ण उपचार घेत आहे व सात रूग्ण दगावले आहेत असे लासलगाव रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळकृष्ण अहिरे,डॉ. अविनाश पाटील यांनी सांगितले.

फोटो लासलगाव येथील कोरोना कोव्हीड उपचार केंद्रातुन बरे झालेल्या लासलगाव रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळकृष्ण अहिरे डॉ. अविनाश पाटील , अहिरे डॉ. शुभांगी भारती, डॉ. मगर डॉ. ढेपले डॉ. सारंग मराठे, डाॅ. वैभव देवरे दिसत आहेत