लासलगाव : जुनी विहीर दुरुस्ती पंप संच, ठिबक, पाईप घटकांचे कार्यरंभ आदेश शेतकऱ्यांना वितरित

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – निफाड पंचायत समिती कृषी विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत जुनी विहीर दुरुस्ती पंप संच, ठिबक व पाईप या घटकांचे कार्यारंभ आदेश तालुक्यातील शेतकऱ्यांना आज वितरित करण्यात आले.

पंचायत समितीच्या सभागृहांमध्ये बोलताना तालुक्यातील सर्व लाभार्थींना शासनाच्या विविध योजना आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पंचायत समिती जिल्हा परिषद तसेच राज्याचा कृषी विभाग, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच कृषी मंत्री दादा भुसे यांच्या माध्यमातून तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत येणारी प्रत्येक योजना पोहोचवण्याचं काम करणार असल्याचे प्रतिपादन या कार्यक्रमाच्या प्रसंगी पंचायत समितीचे उपसभापती शिवा पाटील सुरासे यांनी केले.

तसेच शेतकऱ्यांनी पंचायत समितीच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा व स्वालंबी व्हावे पंचायत समिती कृषी विभागाच्यावतीने येणारी प्रत्येक योजना आपल्यापर्यंत पोहोचण्याचे काम करणार असल्याचं प्रतिपादन गटविकास अधिकारी संदीप कराड यांनी केले.

याप्रसंगी सभापती अनुसया जगताप, उपसभापती शिवा पाटील सुराशे, गटविकास अधिकारी संदीप कराड, विस्तार अधिकारी कैलास गादड, सामान्य प्रशासन प्रमुख विलास शेळके, पंचायत समिती सदस्य राजेश पाटील, सोमनाथ पानगव्हाणे, पंडित आहेर दिलीप सूर्यवंशी, संजय शेवाळे, बंडू आहेर, नितीन पवार, नितीन जाधव, कमल राजोळे, रत्ना संगमनेरे सुलभा पवार, अलका घोलप, रंजना पाटील, गयाताई सुपनर, तालुका कृषी अधिकारी भटू पाटील, कृषी अधिकारी बी एस खेडकर, नागपूरकर, हिरे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.