लासलगाव : NHRDF च्या केंद्रावर कांद्याचे बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची तोबा गर्दी, बियाणे मिळत नसल्याने कृषी मंत्र्यांकडे करणार तक्रार

लासलगाव : कांद्याचे बियाणे खरेदीसाठी लासलगाव येथील राष्ट्रीय बागवनी अनुसंधान एवं विकास प्रतिष्ठान (एनएचआरडीएफ) च्या केंद्रावर कांदा बियाणे मुबलक उपलब्ध्ध होत नसल्याने आपल्याला कसे मिळेेल यासाठी शेतकऱ्यांनी तोबा गर्दी करत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असतांना ही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करत सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवल्याचे दिसले

राष्ट्रीय बागवनी अनुसंधान एवं विकास प्रतिष्ठान (एनएचआरडीएफ)मध्ये तयार झालेल्या दर्जेदार कांदा बियाणास संपूर्ण राज्यातून दरवर्षी चांगली मागणी असते यंदा ही 1 ऑगस्टपासून कांदा बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याने बियाणे खरेदीसाठी नाशिक ,नगर, औरंगाबाद धुळे ,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी लासलगाव येथे शेकडोच्या संख्येने एकाच वेळी कांदा बियाणे खरेदी करण्यासाठी केंद्रावर जमल्याने चांगलाच गोंधळ उडाला, काही शेतकरी रांग सोडून मध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असताना कोरोनाचा प्रादुभाव होऊ शकतो याकडे दुर्लक्ष करत असताना पोलीस व अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगली दमछाक होत होती

दिवसभरात शंभर ते दीडशे शेतकऱ्यांना उपलब्धता नुसार 10 ते 4 किलो ॲग्रीफाउंड लाईट रेड उन्हाळी वाण कांदा बियाणे उपलब्ध करून देत असल्याचे एनएचआरडीएफ लासलगाव केंद्राचे डायरेक्ट सत्येंद्र सिंग सांगितले

रात्री-बेरात्री लासलगाव येथील केंद्रावर बियाणे खरेदीसाठी रांगेत नंबर लावून सुद्धा बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजगी दिसत आहे जास्तीतजास्त कांदा बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकरी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे करणार असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी सोप्निल पवार यांनी सांगितले

अग्रीफाउंड लाईट रेड उन्हाळी वाण खरेदीसाठी कांदा उत्पादक शेतकरी कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव असतानाही का गर्दी
– 1993 मध्ये एनएचआरडीएफ मार्फत विकसित केलेले उन्हाळी वाण
– कांदा रंग फिकट लाल, आकार गोलाकार ,कांदावरील आवरण घट्ट
– कांदा आकार 4-6 सेमी व्यास असलेला
– रोपांचा लागवडीनंतर 100 – 120 दिवसांत काढणीस तयार
– सदर वाणाची साठवण क्षमता अतिशय चांगली
– वाळलेल्या पदार्थांचे प्रमाण 14-15 टक्के
– पायरुव्हीक ॲसिडचे प्रमाण 12.20 मायक्रोमोल / ग्रॅम
– सरासरी उत्पादन 300-350 क्विंटल / हेक्टरी उत्पादन
– रब्बी हंगामासाठी पश्चिम ,उत्तर, दक्षिण आणि मध्य भारतात शिफारस केलेले वाण