Advt.

लासलगाव : बारदाना गोडाऊनला भीषण आग

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन  – येथे बारदान गोडाऊनला गुरुवारी रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान भीषण आग लागली या आगीत लाखो रुपयांचे बारदान जळून खाक झाले आगीचे कारण अस्पष्ट असले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे

लासलगाव जवळील ब्राह्मणगाव विंचूर येथील लासलगाव-पाटोदा रोड वर मनोज जेठालाल चंदे यांचे बारदान गोडाऊन असून या बारदान गोडाउन मध्ये लाखो रुपयांचे बारदान असलेल्या गाठी ठेवण्यात आल्या होत्या गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास आग लागली लासलगाव परिसरात अग्निशामक बंब नसल्याने लागलेल्या आगीने भीषण रूप धारण केले.

या आगीत पत्र्याचे असलेले गोडाऊन आणि बारदान असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे यावेळी आग पाहण्यासाठी विना मास्क ,रुमाल बघ्यांनी मोठी गर्दी केली होती आग विझवण्यासाठी पाणी वाटप करणारे छोटे टँकरने प्रयत्न केला मात्र आग भीषण असल्याने अपयश आलेे दीड तासानंतर पिंपळगाव बसवंत येथील अग्निशामक बंब दाखल झाल्यानंतर आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले