दागीने पाॅलीश करून देण्याच्या बहाण्याने 1 लाख 35 हजार रुपयांचे दागिने लंपास

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – भरवस येथे भांडी घासणीची पावडर विक्री करण्याचा बहाणा करून महिलांचे दागीने दुसऱ्या पावडरने पाॅलीश करून देण्याकरिता ताब्यात घेतलेले एक लाख पस्तीस हजार रूपयांचे दागीने घेऊन दोघा अज्ञात विक्रेत्यांनी पोबारा केल्याची घटना शनिवारी घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, निफाड तालुक्यातील भरवस येथे शनिवारी दि. 15 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास हसीना युनुस शेख या पंचावन्न वर्षीय महिला घरी असताना उंच गोरापान निळ्या रंगाचा हाफशर्ट व दुसरा मध्यम उंचीचा काळ्या रंगाचा फुल शर्ट घातलेले दोघेजण आले व भांडी चकचकीत करण्यासाठी पावडर आहे, तसेच दागीने चकचकीत करण्यासाठी पावडर आहे असे सांगितले. त्यामुळे हसीना युनुस शेख, सिरीन सद्दाम शेख व सुनीता अरूण जाधव यांनी कानातील रिंगा, सोन्याची पोत, झुंगे व टोंगल आदी सुमारे एक लाख पस्तीस हजार रूपयांची दागीने कुकरमध्ये ठेवतो असे सांगितले व बतावणी करून दोघांनी पोबारा केला.

लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे याचे मार्गदर्शनाखाली हवालदार सांगळे अधिक तपास करीत आहेत.