‘हर्षल.. जीवन जगण्याचा समृद्ध ठेवा’ हे पुस्तक लासलगाव वाड्मय मंडळाकडुन प्रकाशित

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – ‘स्व. हर्षल मनोज बेदमुथा’ या युवकाच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त ‘मरावे परी किर्तिरुपी उरावे’ या उक्तीची प्रचिती देत, त्याच्या जीवनावर आधारीत स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा रविवार, दि. २० सप्टेंबर २०२० रोजी शिवकमल मंगल कार्यालय येथे सोशल डिस्टनसिंगचे सर्व नियम पाळून संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी प्रकाशजी होळकर प्रमुख पाहुणे महंत श्री. श्री. १०८ स्वामी जनेश्वरानंदगिरीजी महाराज, बोकडदरे, महंत श्री. श्री. १०८ स्वामी वासुदेवनंदगिरीजी (बहुरुपी) महाराज हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण युट्यूब चॅनल व्दारे देखील प्रक्षेपित केले गेले.
प्रा. डाॅ. प्रतिभा जाधव यांनी पुस्तकाचे विमोचन केले. स्व. हर्षलची बहिण दिया बेदमुथा, लासलगाव वाङ्मय मंडळ अध्यक्ष समीर देवढे, लेखक शिवाजी विसपुते, नामको बँक संचालक प्रकाश दायमा, मनोज शिंगी, राकेश बोरा, प्रा. जितेंद्र देवरे, महेश वाघचौरे, अदिती व्यास आदि मान्यवर आपले मनोगत व्यक्त करताना भावुक होऊन जात होते.

या कार्यक्रमाला जव्हेरीशेठ ब्रम्हेचा, हसमुखभाई पटेल, संतोष पलोड, निलेश देसाई, दिलीप गुंजाळ, लासलगाव वाङ्मय मंडळाचे प्रा. किशोर गोसावी, अरूण भांबारे, कवी कैलास भामरे, डाॅ. विलास कांगणे, राजेंद्र होळकर, संजय बिरार, नुमान शेख, सौ. भारती सोनवणे, अर्चना परदेशी तसेच बेदमुथा परिवार, स्व. हर्षलचा मित्र परिवार, बाबा अमरनाथ सोशल ग्रुप चे सदस्य, गायत्री परिवारातील सदस्य, प. पु. भगरीबाबा भक्त मंडळ उपस्थित होते. सुत्रसंचालन ऋषीकेश जोशी यांनी केले आभार राजेंद्र जाधव यांनी मानले.