लासलगांव : सभापती सुवर्णा जगतापांच्या मध्यस्थीनंतर महिला कामगारांचा संप मागे

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन (राकेश बोरा) – लासलगांव येथील कांदा बारदान पिशवी शिलाईचे काम करणा-या महिलांनी मजुरी दरात वाढ करून मिळावी या मागणीसाठी पुकारलेल्या काम बंद आंदोलन पंधरा दिवसानंतर मागे घेण्यात आला. लासलगांव पोलीस स्टेशन मध्ये झालेल्या बैठकीत दरवाढी संदर्भात ०१ एप्रिल २०२० पासून दहा रुपये वाढ चा निर्णय बारदान दुकानदारांनी घेतला आहे.

बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी पंधरा दिवसापासून बारदान व्यापारी व बारदान पिशवी शिलाई काम करणारे महिला यांच्याशी वारंवार संपर्क साधून दर वाढीचा विषय मार्गी लावला, यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांचे सहाय्य लाभले. लासलगाव पोलीस स्टेशन येथे झालेल्या संयुक्त बैठकित दहा रुपये ही दर वाढ पुढील ३ वर्षाकरिता करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे, बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप, बारदान व्यापारी संघटने चे पुरूषोत्तम चोथाणी, जितेंद्र चोथाणी, मनोज शिंगी, सागर चोथाणी, प्रतिक चोथाणी, सामाजिक कार्यकर्त्या स्मिता कुलकर्णी यांचेसह इतर बारदान दुकानदार व बारदान पिशवी शिवणार संघटनेच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या.

लासलगांव शहरात बारदान पिशवी शिलाईचे काम करणा-या महिलांनी शिलाई मजुरीत वाढ करून मिळावी या मागणीसाठी गेल्या 15 दिवसांपासुन काम बंद आंदोलन पुकारले होते. सदर दहा-बारा दिवस पूर्वी संबंधीत महिलांनी बाजार समितीच्या सभापती सौ. सुवर्णा जगताप यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली होती. त्यानुसार सध्या या महिलांना 100 गोणी शिवण्यासाठी 50 रूपये मजूरी देण्यात येत आहे. परंतू वाढत्या महागाईमुळे ही मजुरी परवडत नसल्याने सदर मजुरीत वाढ करून शेकडा 80 रूपयेप्रमाणे दर वाढ मिळावी अशी मागणी होती, याविषयी चर्चा करून बारदान व्यापारी संघटनेने शेकडा 60 रुपये प्रमाणे दरात वाढ पुढील तीन वर्षासाठी करण्यात आली आहे.

सदर बैठकीस पिशवी शिवणार संघटनेच्या प्रतिनिधी रेणुका पोळ, सोनाली कर्डीले, मुकताताई शिरसाठ, आंधळे, शोभा कर्पे, सुरेखा तनपुरे, संगीता भागवत, लक्ष्मी भागवत, रिना पवार, चैताली विंचु, फर्जाना पटेल, भारती शेजवळ, शीला रणदिवे, सुजाता पगारे यांचेसह परीसरातील महिला उपस्थित होत्या.

फेसबुक पेज लाईक करा –