Lasalgaon : गेल्या शुक्रवारच्या तुलनेत उन्हाळ आणि लाल कांद्याच्या दरात मोठी घसरण

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – लासलगाव सह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये उन्हाळी व लाल कांद्याच्या भावात घसरण सुरूच आहे येथील मुख्य बाजार समितीत गेल्या शुक्रवार (२०) च्या तुलनेत तब्बल आठवडे भरात आज उन्हाळ कांद्याचा कमाल भावात १७०० तर सरासरी भावात १९०० आणि लाल कांद्याचे कमाल भावात ११०० तर सरासरी १०५० रुपये प्रति क्विंटल इतकी मोठी घसरण झाली आहे

गेल्या शुक्रवारी लासलगाव बाजार आवारात उन्हाळ कांद्याचे किमान १००० कमाल ५०५१ सरासरी ४४०० रुपये दराने विक्री झाली होती तर आज उन्हाळ कांद्याला किमान ९०० कमाल ३३६० सरासरी २५०० रुपये भाव मिळाला. तर लाल कांद्याला किमान ७०२ कमाल ५००१ सरासरी ४३०० रुपये भाव मिळाला होता तर आज लाल कांद्याला किमान १००० कमाल ३९०० सरासरी ३२५० रुपये भाव मिळाला.

आठवडाभरात कांद्याच्या भावात दररोज घसरण होत होत आज तब्बल १७०० ते १९०० तर लाल कांद्याच्या भावात ११०० रुपये पर्यंत घसरण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त होत आहे. कोरोणाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत असताना लॉकडाऊन सावटाखाली अद्यापही शेतकरी असल्यामुळे आज लासलगाव कांदा आवारावर १२१४ वाहनांमधून १३ हजार ५६५ कांद्याची आवक झाली.एप्रिल महिन्यांपासून चाळीत साठवून ठेवल्याने उन्हाळ कांद्याची प्रत हवामानातील बदलामुळे खराब होत असल्याने कांद्याच्या भावात घसरण सुरू असतानाही कांदा विक्री कडे उत्पादक शेतकऱ्यांचा कल दिसत आहे

You might also like