लासलगाव : धनादेश न वटल्याप्रकरणी कर्जदारास 6 महिने कारावास

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – लासलगाव व्यापारी सहकारी बँकेचे कर्जदार गणेश आत्माराम चांदोरे (रा. लासलगाव) यांस लासलगाव व्यापारी सहकारी बँकेचे कर्जपरतफेडीचा 1,75,000/-चा धनादेश न वटल्याचे प्रकरणी निफाडचे वरिष्ठ स्तर न्यायाधीश एस बी.काळे यांनी सहा महीने कारावास व 175000 रूपये दंडाची व दंडाची रक्कम न भरल्यास 3 महीने कैदेची शिक्षा ठोठावली.

याबाबत अधिक माहिती अशी की, लासलगाव व्यापारी सहकारी बँकेचे कर्जदार गणेश आत्माराम चांदोरे यांनी 3 लाख रूपये रक्कमेचे कर्ज दिनांक 30 मार्च 2013 रोजी घेतले, परंतु हे कर्ज वेळेवर भरले नाही त्यामुळे कर्ज थकित झाले. थकीत कर्जरक्कम भरण्यासाठी लासलगाव व्यापारी सहकारी बँकेचे वसुली अधिकारी यांना लासलगाव व्यापारी सहकारी बँकेचा 12 फेब्रुवारी 2016 रोजीचा धनादेश नंबर 36505 हा रक्कम रूपये 1,75,000/- रूपयांचा दिला होता. परंतु खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नसल्याने हा धनादेश न वटता परत आला. वकीलांच्या मार्फत नोटीस देऊनही कर्जदाराने धनादेशाची रक्कम 175000 ही मुदतीत दिली नाही. म्हणुन बॅकेने कर्जदाराविरूध्द निफाड न्यायालयात तक्रार दाखल केली होती. फिर्यादी बॅंकेचे वतीने वरीष्ठ अधिकारी शमशुद्दीन शेखलाल काद्री यांची साक्ष वकीलांनी नोंदविली होती.

सदर प्रकरणी चांदोरे यांस निफाडचे वरिष्ठ स्तर न्यायाधीश एस बी.काळे यांनी सहा महीने कारावास व 175000 रूपये दंडाची व दंडाची रक्कम न भरल्यास 3 महीने कैदेची शिक्षा ठोठावली. फिर्यादी बॅंकेचे वतीने अॅड. सुभाष एस. देशमुख यांनी कामकाज पाहीले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/