लासलगाव : पिंपळगाव नजीक येथे बिबट्याचे दर्शन

लासलगाव – लासलगाव जवळील पिंपळगाव नजील येथे मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.या परिसरात वनविभागाने तातडीने पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास पिंपळगाव नजीक वाकी रस्त्यावरील सागर आढाव हे त्यांच्या द्राक्ष बागेत औषध फवारणी करून ट्रॅक्टर वरून घरी जात असताना त्यांच्या शेतातील पाण्याच्या टाकीजवळ त्यांना एक बिबट्या चे दर्शन झाले.त्या वेळी या बिबट्याने ट्रॅक्टरचे लाईट बघून वेळापूरचे दिशेने दिशा धूम ठोकली.

बऱ्याच दिवसांनंतर या परिसरात बिबटयाने प्रवेश केल्यामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने या परिसरात तातडीने पिंजरा लावण्याची मागणी शेतकरी अंबादास जाधव,गंगाधर खुडे,प्रमोद आढाव,शरद घोडे,आनंद आढाव,चारुदत्त आढाव,भाऊसाहेब सोनवणे यांसह ग्रामस्थांनी केली आहे.

निफाड तालुक्यातील बऱ्याच गावातील ऊस तोडणी संपुष्टात आल्यामुळे हे बिबटे दुसरा आश्रय घेण्यासाठी अन्य गावात शिरकाव करत आहे.त्यामुळे ऊस,मका या पिकांच्या क्षेत्रातील वास्तव्य करणारे बिबटे आता अन्यत्रही दिसू लागले आहे.त्यांच्यापासून सुरक्षेसाठी आता नव्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत.