लासलगाव : तामसवाडी पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन  –  निफाड तालुक्यातील तामसवाडी येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला हा मादी बिबट्या अंदाजे दोन वर्षाचा आहे अद्यापही या परिसरात दोन बिबट्यांचा वावर असल्याने पिंजर्यांची संख्या वाढवून परिसर बिबटेमुक्त करण्याची ग्रामस्थांची वनविभागाकडे मागणी

निफाड तालुक्यातील तामसवाडी येथे बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने येथील शेतकरी प्रकाश सांगळे यांनी वनविभागाकडे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शेतात पिंजरा लावण्याची मागणी केली होती आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती वन विभागात ला देण्यात आली वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांच्यासह कर्मचारी तामसवाडी येथे दखल होत बिबट्याला ताब्यात घेतले व निफाड येथील वनविभागाच्या रोपवाटिका केंद्रात आणले या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार असून बिबट्याला तपासणीनंतर पुन्हा जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती निफाड वन विभागाने दिली