लासलगाव : ‘लॉकडाउन’चे नियम पाळत मोहरम सण साजरा

लासलगाव पोलीसनामा ऑनलाइन : कोरोना महामारीच्या संकटामुळे शासनाने दिलेल्या आदेशानुसार लॉकडाउन चे सर्व नियमांचे पालन करून लासलगाव शहरात अत्यंत साध्या पध्दतीने मुस्लिम बांधवांनी मोहरम सण साजरा केला.

या निमित्ताने पिंजरा गल्ली येथील गौसे आजम सोशल ग्रुप तसेच न्यू संजरी सोशल ग्रुप च्या वतीने सोशल डिस्टन्स चे सर्व नियम पाळून लासलगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे यांच्या हस्ते हिंदू-मुस्लिम बांधवांना सरबत वाटून मानवतेचा व शांततेचा संदेश दिला तसेच सर्वांनी ह.इमाम हुसैन व त्यांच्या अनुयायांना अभिवादन केले व संपूर्ण जगाची या कोरोना च्या संकटातून लवकर मुक्तता व्हावी अशी प्रार्थना देखील या वेळी करण्यात आली.

इस्लाम धर्माचे संस्थापक मोहंमद पैगंबर यांना व त्यांच्या मानवता व नैतिकतेच्या तत्वांना स्मरण करून तसेच बगदाद येथील करबला येथे यसजीत या हुकूमशहाच्या अत्याचाराविरुद्ध लढताना इमाम हसन व हुसेन हे शहीद झाले होते. तो महिना मोहरमचा होता.या युद्धात हसन व हुसेन यांना पंधरा दिवस पाणी मिळाले नव्हते त्यामुळे त्यांच्या स्मृतिनिमित्त शहरातील सर्वे नंबर ९३ इस्लाम पुरा,ईदगाह,टिळक रोड,इंदिरा नगर,रजा नगर अश्या विविध मुस्लिम बहुल भागात विविध ग्रुपच्या वतीने सोशल डिस्टन्स चे नियम पाळून जागोजागी गोड शरबत वाटप करण्यात आले.

या वेळी अरबाज मनियार,अर्शद शेख,इरफान मनियार,मिरान पठाण,शहजाद पठाण,आयाज शेख,सागर आहिरे,सोनु शेजवळ,मोबीन शेख,अजर पठान,मोनु तांबोळी,समीर पठाण,सोनु शेख,निहाल पठाण,वसीम पठाण आदी उपस्थित होते