लासलगाव : भाजपच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिक जिल्हा भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष केदा नाना आहेर यांनी जिल्हा कार्यकारिणी घोषित केली असून यामध्ये लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांची भाजप महिला नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी तसेच नाशिक मर्चंट को ऑप बँकेचे संचालक प्रकाश दायमा यांची कोषाध्यक्ष पदी व पंचायत समिती सदस्य संजय शेवाळे यांची भाजपच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

या निवडीबद्दल या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला वेळी जिल्हा परिषद सदस्य व लासलगाव मंडळ अध्यक्ष डी के जगताप,जेष्ठ नेते राजेंद्र चाफेकर, लासलगाव शहराध्यक्ष योगेश पाटील,डॉ शेखर सालगुडे,रविंद्र होळकर,मनोज भावसार,ग्रा प सदस्य निलेश लचके,ग्राहक मंच तालुकाध्यक्ष ज्योती शिंदे,निलेश सालकाडे,नितीन शर्मा,सोपान दरेकर,ज्ञानेश्वर इंगळे,वनस भावसार,संतोष पवार,केशव पवार,उदय जाधव,नितीन शर्मा,अनिल नवले हे उपस्थित होते.