लासलगाव : सलून व्यवसाय सुरू करण्याची मागणी

लासलगाव – लॉकडाऊन दरम्यान ८१ दिवसांपासुन सलुन व्यवसाय बंद आहेत. महाराष्ट्रात सलुन व्यवसाय सुरू करण्यास शासनाने अजुन परवानगी दिलेली नाही. त्यामुळे या व्यवसायावर व या व्यवसायात काम करणाच्यांवर वेरोजगारीचे संकट कोसळले असुन कुटुंवावर उपासमारीची वेळ आलेली आहे.सलून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी सह आर्थिक मदत मिळणेबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ईमेल द्वारे विनंती करण्यात आली आहे.

सलुन व्यवसाय करणारे लोक हे सर्वसामान्य कुटुंबातील असुन उपजिवीकेचे दुसरे साधन नाही.वीज बील, दुकान भाडे, कर्जाचे हप्ते, घरभाडे आदी प्रश्न गेल्या ३ महिन्यापासुन थकलेले आहे.यासर्व परिस्थितीमुळे फार मोठे आर्थिक संकट उभे ठाकले असुन आता आत्महत्या वाढण्याची शक्यता आहे.

ईरळी तालुका-कवठे महाकांळ जि.सांगली येथील नाभिक कारागिराने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असुन तो व त्याची दोन लहान मुलांवर सांगली येथील सिव्हील हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहे. सलुन व्यवसायिकांच्या कुटुंदियांचा उदरनिर्वाह सलुन व्यवसायावरच अवलंबुन असल्याने व इतर उपजितिकेचे साधन नसल्याने व्यवसाय सुरू होण्यास परवानगी द्यावी. तसेच शासनाने ठरवुन दिलेल्या निकषांनवर व सुरक्षेचे सर्व नियम पाळुन सलुन व्यवसायीक सदर व्यवसाय सुरू करतील. तसेच शासनाकडुन सर्व सलुन व्यवसायांवर अवलंबुन असलेल्या कुटुंबांना रूपये ५००००/- ची आर्थिक मदत जाहीर करावि अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

तसेच याबाबत मंडल अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी महेश साळुंके , सुरेश आंबेकर ,राजेन्द्र आंबेकर, अविनाश देसाई,रमेश निकम व कार्यकर्ते उपस्थित होते