कांदा लोडिंग सुरू असताना ओव्हरहेड वायरचा जोरदार झटका, युवक गंभीर जखमी

लासलगाव – येथील रेल्वे स्थानकावर रात्री नऊ वाजून 30 मिनिटांच्या दरम्यान कोलकत्तासाठी
कांदा लोडिंग सुरू असताना बोगीवर चढत ओव्हरहेड वायरला धक्का लागल्याने समाधान नवनाथ शिरसागर राहणार नांदूर मध्यमेश्वर याला विजेचा जोरदात झटका लागत गंभीर जखमी झाला.या झटक्यात सदरचा युवक ७०% भाजला असल्याचा अंदाज आहे.

लासलगाव रेल्वे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, येथील रेल्वे स्थानकावर सध्या कांदा लोडिंग चे काम सुरु आहे. येथून कोलकत्ता येथे ४० बोगीची रॅक असलेली मालगाडी १६०० टन कांदा भरण्याचे काम सुरू होते दरम्यान लोडिंग सुरू असताना निफाड येथील माल ट्रक क्रमांक एमच १५ जीव्ही ६९५५ कांदा लोडिंगसाठी आली असता गाडी ड्रायव्हर सागर पवार आपला ट्रक बोगी जवळ लावत असतांना सोबत असलेला समाधान नवनाथ शिरसागर लोडिंग साठी पोल क्रमांक २३५/१०-१२ जवळ उभ्या असलेल्या मालगाडीच्या वरती चढत ओव्हरहेड वायरचा जोरदार धक्का लागल्याने सदरचा युवक गंभीर भाजल्याची घटना आज येथील रेल्वेस्थानकावर रात्री साडेनऊच्या दरम्यान घडली.

दरम्यान दहा वाजेता रुग्णवाहिकेत या युवकास निफाड येथील उपजिल्हा रुग्णालयातउपर रुग्णालयात पुढील उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे