राजगृहावर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन –  भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन शहर भारिप बहुजन महासंघ व वंचित बहूजन आघाडी यांच्या वतीने लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे यांना देण्यात आले

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’वर दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली.यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड झाली आहे. घराच्या काचांवरही दगडफेक झाली असून कुंड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.या घटनेचा लासलगाव शहर भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडी च्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.

राजगृहावर हल्ला करणाऱ्या समाज कंटकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी भारिप शहराध्यक्ष सोनू शेजवळ,युवा शहराध्यक्ष सागर आहिरे,अमोल संसारे,इरफान मणियार,हर्षद शेख,विकास खंडिझोड, राहुल शेजवळ यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या निवेदनातून केली आहे.या वेळी अनिल मुथा,राहुल पवार,विपुल शेजवळ,निवृत्ती विस्ते,रवी विस्ते आदी समाजबांधव उपस्थित होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like