रामपुर महोत्सवात लासलगांवच्या सानिकाचा ‘डंका’

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन (राकेश बोरा) – रामपुर उत्तरप्रदेश मध्ये आयोजित रामपुर महोत्सवामध्ये लासलगांवच्या सानिका केंगे आणि लखनौ के नवाब म्हणून प्रचलित असलेला झी लिटिल चैम्प विजेता, सारेगामा विजेता गायक तन्मय चतुर्वेदी यांना सांगता सोहळ्या साठी जिल्हा प्रशासनाने आमंत्रित केलेले होते. या दोघांनी यात जोरदार गायन सादर करत रसिकाना मनमोहित केले. सानिकाने ‘दिलवालो के दिल का करार लूटने मैं आयी हु यूपी बिहार लूटने’ या गाण्याने सुरवात करत संपूर्ण महोत्सवात धमाल उडवून दिली. सानिकाने तिचे माध्यमिक शिक्षण लासलगांव मध्ये पूर्ण करत नाशिक येथे पुढील शिक्षण घेत आहे. सानिकाला उत्कृष्ट गायिका म्हणून अनेक पुरस्कार मिळाले असून दोन चित्रपटात पार्श्व गायन केले आहे.

रामपुर हे उत्तर प्रदेशातील प्राचीन असे सांस्कृतिक वारसा असलेले शहर म्हणून प्रचलित आहे. येथील रामपुर महोत्सव म्हणजे देशातील अग्रगण्य महोत्सव म्हणून ओळखले जाते. मोठे सिने तारका या महोत्सवास उपस्थित राहून या महोत्सवाची शोभा वाढवतात. अशा या ऐतिहासिक महोत्सवा करीता लासलगांवच्या सानिका महेश केंगे या यूवतील परफॉर्मेंस करता आमंत्रण मिळाले सानिकाने सुद्धा या रामपुर फेस्टिवल मध्ये धमाकेदार परफॉर्मेंस सादर करत उपस्थितांची मने जिंकली. लासलगांव सारख्या छोट्याश्या गावातील सानिकाने सुंदर अशी गाने सादर करत रामपूर फेस्टिवल मध्ये लासलगांवचा ठसा उमटविला.

सानिकाला तिच्या दमदार गायनासाठी रामपुर फेस्टिवल मध्ये सन्मानित करण्यात आले. तिच्या या यशाबद्दल लासलगांव व परिसरातून कौतुक केले जात आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

 

You might also like