Lasalgaon News : लासलगाव पोलिसांचे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनोखे उपक्रम

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन  –  आगामी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूक (Gram Panchayat Election)  प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी निफाडचे उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांनी गावोगावी होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक उमेदवार, राजकीय पक्षाचे नेते, प्रतिष्ठित नागरिक यांना पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये बोलवत निवडणूक प्रक्रिया हसत-खेळत पार पाडावी यासाठी बैठक घेतली. निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या नियमावली नुसार प्रक्रिया पार पाडून सर्व उमेदवारांनी सहकार्य करावे आणि निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावे असे आवाहन याद्वारे केले. यावेळी व्यासपीठावर सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे उपस्थित होते.

ग्रामपंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडावी यासाठी पोलिस प्रशासनाने गावोगावी जाऊन गावातील प्रतिष्ठित नागरिक, उमेदवार यांच्या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये बैठका घेऊन अनोखा उपक्रम पार पडला. लासलगाव पोलीस स्टेशनच्या आवारात निफाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

यावेळी मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, जि प सदस्य डिके जगताप, नामकोचे संचालक प्रकाश दायमा, संजय पाटील, प्रकाश पाटील,गुणवंत होळकर,पं स सद्स्य शिवा सुरासे,राजेंद्र चाफेकर,बालेश जाधव,सचिन होळकर, गोकुळ पाटील, राम बोराडे,अफजल शेख,राजू जाधव, रामनाथ शेजवळ,दत्ता पाटील,चंद्रकांत शेजवळ,मिराण पठाण, स्मिता कुलकर्णी, अश्विनी पाटील,अनिता खैरे,ज्योती निकम,अश्विनी बर्डे आदी उपस्थित होते.