निच्चांकी तापमानाला पोहण्याचा आनंद लुटणारे लासलगावचे ‘स्वीमर्स’

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन – लासलगाव येथील ग्रुप चे सदस्य खडक माळेगाव येथील साठवण बंधाऱ्यावर नियमीत पणे पोहण्यासाठी जातात. शुक्रवारी नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष पंढरी म्हणणाऱ्या निफाड तालुक्यात नीचांकी तापमान 2.4 अंश सेल्शीअस असतानाही नियमितपणे पोहण्याचा आनंद लुटला.

येथील स्विमिंग ग्रुप मध्ये 250/300 सदस्य आहेत. पण हि संख्या उन्हाळ्यात दिसते. जसा हिवाळा सुरू होतो तशी ही संख्या कमी कमी होत जाते. तथापि राज्यात काल नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यात कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागाने गुरुवारच्या तुलनेत सात अंशाने घसरण होऊन 2.4 अंश सेल्शीअस असताना देखील दहा ते पंधरा सदस्यांनी थंडीची तमा न बाळगता त्याचा मनमुराद आनंद लुटला.

यामध्ये संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अनिल बोराडे, महेंद्र सुनिल ठोंबरे, महिपत ठाकरे, रमेश कर्डक, संदीप अग्रवाल, एकनाथ गारे, अजय अग्रवाल, अनावडे, बापू मोरे, संतोष जेउघाले, नंदू डोंगरे यांनी पोहोण्याचा मनमुराद आनंद लुटला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/