लासलगांव मुख्य बाजार आवारावरील कांदा लिलाव पुर्ववत सुरू होणार

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन  –  येथील बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावरील कांदा लिलाव पुर्ववत सुरू करणेबाबत बाजार समितीचे पदाधिकारी व व्यापारी वर्ग यांचेत झालेल्या संयुक्त बैठकीत शुक्रवार, दि. 15 पासुन मोकळ्या स्वरूपातील कांदा ह्या शेतीमालाचा लिलाव पुर्ववत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीच्या सभापती  सुवर्णा जगताप यांनी दिली.

सध्या जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने वाढत असल्याने कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र शासनाने संपुर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केल्याने व्यापारी वर्गास प्रतवारी, पॅकींग व लोडींगचे कामकाज करणेसाठी पुरेशा प्रमाणात मजुर उपलब्ध होत नसल्याने व लासलगांव परिसरात कोरोना संसर्ग रूग्ण आढळल्याने शासनाने लासलगांव परीसर हा कंटेनमेंट झोन म्हणुन घोषित केल्याने दि. 07 मे पासुन येथील कांदा लिलावाचे कामकाज बंद होते. परंतु लासलगांव येथील दोन्ही रूग्ण निगेटिव्ह निघाल्याने दि. 07 पासुन बंद असलेले कांदा ह्या शेतीमालाचे लिलाव पुर्ववत सुरू करणेबाबत आज बाजार समितीचे पदाधिकारी व व्यापारी वर्ग यांची संयुक्त बैठक होऊन सदर बैठकीत कांदा ह्या शेतीमालाचे लिलाव दररोज पहील्या सत्रात म्हणजे सकाळी 08.30 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत प्रथम प्राधान्याने येणा-या फक्त 500 वाहनांचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला असुन शेतकरी बांधवांनी आपला कांदा हा शेतीमाल मोकळ्या स्वरूपात प्रतवारी करून विक्रीस आणावा असे आवाहन  जगताप यांनी केले.

यावेळी कांदा व्यापारी नितीनकुमार जैन, ओमप्रकाश राका, मनोज जैन, प्रविण कदम, बाळासाहेब दराडे, ओम चोथाणी, संतोष माठा, अफजल शेख, अनिल आब्बड, तुषार देवरे, दत्तात्रय खाडे, निलेश सालकाडे, सुरेश बोडके, अशोक केदारे, रमेश घोडके, संदीप गोमासे, राहुल बरडीया, भास्कर कोकणे, अनिल जाधव, बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे, सहाय्यक सचिव सुदीन टर्ले, प्रकाश कुमावत, लेखापाल अशोक गायकवाड, सुनिल डचके, संदीप निकम, मनोज शेजवळ, स्वप्निल पवार आदि उपस्थित होते.