घरफोडी करणार्‍या सराईत चोरटयाला लासलगाव पोलिसांकडून अटक

लासलगाव – लासलगाव व परिसरामध्ये घरफोडी करत धुमाकूळ घालणारा चोरटा भुषण सुधाकर धोदमल वय २२ वर्षे याला रंवदा ता कोपरगाव येथून ताब्यात घेतले आहे.२५ सप्टेंबर रोजी न्यायालय निफाड येथे हजर केले असता न्यायालयाने आरोपीतास न्यायालयीन कोठडी दिली आहे

याबाबत अधिक माहिती अशी की, लासलगाव पोलिस ठाण्यात अजय शर्मा सोहन नगर,लासलगाव यांच्या घरी चोरी झाली होती यानुसार अजय शर्मा यांच्या फिर्यादीवरून लासलगाव पोलीस ठाण्यात भादवी कलम ४५७, ३८०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयाचा तपासाबाबत गुप्तबातमी दारामार्फत मिळलेल्या माहिती नुसार सहा पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक रामकृष्ण सोनवणे,पोहवा ठोंबरे, पोना कैलास महाजन, पोकॉ प्रदिप आजगे, पोकॉभगवान सोनवणे यांचे पथक तयार करून सदर पथकाने भुषण सुधाकर धोदमल वय २२ वर्षे रा सोहननगर लासलगाव ता निफाड हल्ली रा रंवदा ता कोपरगाव यास ताब्यात घेतले त्यास पोलीस स्टेशन येथे आणुन चौकशी केली असता त्यांने सोहननगर येथुन घरफोडी चोरी केल्याचे कबुली दिली असुन सदर गुन्हयात चोरी गेलेली ४,००० रोख रक्कम हस्तगत करण्यात आले असुन सदर आरोपीकडे पोलीस कोठडी दरम्यान अधिक चौकशी केली असता त्यांने गणेश प्रभाकर गारे रा खानगाव नजिक ता निफाड यांचे एमआय कंपनीचे दोन मोबाईल फोन २१ मे रोजी चोरी केल्याचे कबुली दिली आहे त्यावरुन लासलगाव पोलीस स्टेशनकडे २१ मे रोजी गणेश प्रभाकर गारे रा खानगाव नजिक ता निफाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भादवि कलम ३७९, ३८० प्रमाणे मोबाईल चोरीचा गुन्हा उघडीस आला असुन सदर गुन्हाचा तपास सहा पोलीस उप निरीक्षक राजेंद्र अहिरे हे करीत होते गुन्हयात चोरीस गेलेले २ मोबाईल फोन किंमत रुपये १४,००० चा मुददेमाल आरोपीकडुन हस्तगत करण्यात आला असुन ओरापी यास २५ सप्टेंबर रोजी न्यायालय निफाड येथे हजर केले असता न्यायालयाने आरोपीस न्यायालयीन कोठडी दिली आहे

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like