लासलगाव पोलिसांकडून विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन  –  कोरोना संसर्गाची दुसऱ्या लाटेचा प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाय योजना केली जात आहेत.मात्र नागरिकांकडून पुन्हा विनामास्क फिरणे, सोशल डिस्टंन्स न राखणे,सिनिटायझर न ठेवणे अशा अनेक प्रकार सुरू आहेत.लासलगाव पोलीसांनी १३ गुन्हे दाखल करून तीन हजार नऊशे रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे दिली.

या गोष्टींना पायबंद घालण्यासाठी लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे,पो उ नि रामकृष्ण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने लासलगाव शहरात कारवाईचा बडगा उगाराला आहे.रविवारी या पथकांकडून लासलगाव शहरातील विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर भा द वि कलम १८८,२६९,२७० अंतर्गत १३ गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती खंडेराव रंजवे यांनी दिली.

दिवाळीच्या सनानंतर नाशिक जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याचे चित्र दिसत आहे.खरेदीच्या निमित्ताने असलेली नागरिकांची गर्दी कोरोना संसर्ग विसरली आहे की काय असा सवाल सुज्ञ नागरिकांकडून विचारला जात आहे.शहरातील प्रत्येक दुकानाबाहेर तसेच रस्त्यावर विनामास्क आणि सोशल डिस्टंन्स नसल्याचे चित्र दिसत आहे.बेफीकर पणे विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांविरुद्ध लासलगाव पोलिसांकडून दंडात्मक करावाई सुरू करण्यात आली आहे.