लासलगाव पोलीस ठाण्यास निर्जंतुकीकरण यंत्र भेट

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना पासून बचाव करण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते कैलास उपाध्ये यांच्या कडून लासलगाव पोलीस ठाण्यास निर्जंतुकीकरण यंत्र देण्यात आले. त्यामुळे बंदोबस्त वरून आलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी व पोलीस ठाणे यातून निर्जंतुकीकरण करता येणार आहे.

देशात कोरोना आजाराने थैमान घातले आहे.कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.ही चिंताजनक बाब आहे. यातही ग्रामीण भागात याचे प्रमाण लक्षणीय आहे. या परिस्थितीत देखील पोलीस रस्त्यावर उतरून काम करत आहेत. अनेक संवेदनशील भागात गस्त घालावी लागत आहे. त्यावेळी अनेक जण त्यांच्या संपर्कात येतात त्यामुळे त्यांना या पासून धोका असतो,तर पोलिसांना स्वतःच्या परिवरपासून लांब रहावे लागत आहे. त्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते कैलास उपाध्ये यांच्याकडून येथील पोलिस ठाण्यास हे निर्जंतुकीकरण यंत्र देण्यात आले आहे. गस्तीवर जाताना आणि आणि परत आल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांना याचा उपयोग होणार आहे.