केंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी विरोधी निर्णयाला विरोध ! राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे लासलगावला धरणे आंदोलन

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन –    केंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी ,कामगार, व व्यापारी यांच्या विरोधातील निर्णया विरुद्ध धरणे आंदोलन महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमीटि चे प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार २ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट नंबर १ मध्ये आयोजीत केले आहे. तरी सर्व शेतकरी, कामगार,व्यापारी बांधवांनी उपस्थित रहाण्याची विनंती काँग्रेसचे नेते गुणवंत होळकर यांनी केले आहे

केंद्र शासनाने घेतलेल्या या अन्यायकारक शेतकरी व कामगार यांच्या विरोधात कायदा केल्याने लासलगाव मध्ये धरणे आंदोलन होणार आहे.केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विषयक विधेयकाला काँग्रेस पक्षाचा विरोध आहे. ही विधेयके शेतकरी विरोधी असून ते रद्द केले पाहिजेत यासाठी या विधेयकाच्या विरोधात देशभरात काँग्रेस पक्ष आंदोलन करत आहे.याच पार्श्वभूमीवर लासलगाव येथे राज्याचे महसूल मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमीटि चे प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार असून शेतकरी ,कामगार घटक यांनी मोठ्या संख्येने उपस्थीत राहण्याचे आवाहन काँग्रेसचे नेते गुणवंत होळकर यांनी केले आहे.