लासलगाव नाभिक समाजाच्या वतीने अर्धनग्न आंदोलन

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन  –  राज्य सरकारने सर्व व्यवसायांना परवानगी दिलेली असताना मात्र सलून व्यावसायिकांना परवानगी नाकारलेली आहे याचा निषेध करण्यासाठी फलक हातात घेत लासलगाव नाभिक समाजाच्या वतीने अर्धनग्न आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधत सलून व्यवसाय सुरू करण्यास तातडीने परवानगी मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.

नाभिक समाजाचा पारंपरिक व्यवसाय असलेला सलून व्यवसाय गेल्या ७५ ते ८० दिवसांपासून पूर्णपणे बंद झालेला आहे सलून काम करणारे कारागीर व मालक त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली असताना देखील राज्य सरकारने सर्व व्यवसायांना परवानगी देत सलून व्यवसायाला परवानगी नाकारलेली आहे. हतबल झालेल्या नाभिक समाजाच्या वतीने लासलगाव येथे बुधवारी आपापल्या दुकानाबाहेर अर्धनग्न आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध करुन त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. कर्नाटक सरकारच्या धर्तीवर सलून कामगारांना दरमहा १० हजार रुपये मानधन मिळावे व लाॅकडाऊन काळातील विज बिल ,घरभाडे व दुकान भाडे माफ करावे, सलून व्यावसायिकांना विमा संरक्षण मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे

यावेळी लासलगाव येथील कामगार तलाठी सागर शिर्के यांना तातडीने सलून व्यवसाय सुरू करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. निवेदनाच्या प्रती तहसीलदार व उपविभागीय अधिकारी निफाड यांना पाठविण्यात आल्या आहेत. यावेळी श्री संत सेना चारीटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष अरविंद देसाई, अनिल वाघ ,अशोक जगताप, राजाभाऊ जाधव, संदीप वाघ, तुषार जगताप, नितीन वाघ,महेश साळुंखे ,रवी वाघ, अभिजित जगताप, मगन औटे ,रमेश वाघ, शशिकांत महाले, दिलीप साळुंखे, महेश संत, नितीन वाघ,दत्ता वाघ, राजेंद्र वाघ, विजय जाधव, सुनील वाघ, परेश जाधव, मनिष देसाई यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.