लासलगाव रेल्वे स्थानकावरील आरक्षण केंद्र सुरू

लासलगाव :  वार्ताहर –  मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीकरिता आजपासून पुन्हा रेल्वेचे आरक्षण कार्यालय सुरू केले असून लासलगाव येथील आरक्षण खिडकीवर सोशल डिस्टन पाळून प्रवाश्यांनी लांब पल्याच्या गाड्यासांठी आरक्षण केले. गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशी वाहतूक आणि रेल्वे आरक्षण सुविधा बंद करण्यात आलेल्या होत्या मोठ्या कालावधीनंतर पुन्हा आरक्षन विंडो सुरू झाल्याने लासलगाव रेल्वे स्थानकावर प्रवासी आरक्षणकरीता रांग लावताना दिसत होते.

मंडल रेल प्रबंधक, भुसावळ, यांच्या सुचने नुसार, भुसावळ मंडळ विभागाच्या आठ रेल्वे स्टेशनांवर, आरक्षण कार्यालय सुरू झाले असून रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी आरक्षण करण्यासाठी व तिकीट रद्द करण्या करिता सोमवार दिनांक 13.07.2020 पासून भुसावळ मंडळाच्या 1) निफाड, 2) लासलगांव, 3) बोदवड, 4) नांदुरा, 5) खामगांव, 6) मुर्तिजापुर, 7) कारंजा, 8) रावेर. या आठ ठिकाणी आरक्षण कार्यालय सकाळी 08.00 ते 16.00 वाजे पर्यंत एका शिफ्ट मध्ये खिडकी सुरू करण्यात आली आहे अशी माहिती स्टेशन प्रबंधक समाधान सुरवाडे यांनी दिली.