देवगाव येथील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, पोस्को अंतर्गत FIR दाखल

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – देवगाव येथील फिर्यादीचे बहीणीचे घरी असलेल्या येथील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवुन ८ नोव्हेंबर २०१८ रोजी पळवुन नेऊन तिचेशी शारिरिक संबंध ठेवुन अपत्य प्राप्ती केल्या प्रकरणी योगेश संतोष माळी (वय 22 रा. इंदिरा नगर देवगाव) याचे विरुद्ध IPC 376 (3),366, व POCSO का कलम 4,6 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून यातील पीडित मुलगी व आरोपी यांचा शोध तांत्रिक माहितीच्या आधार घेऊन आरोपीला २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी सायंकाळी अटक करण्यात आली आहे.

सदर गुन्हाचा तपास पोलीस अधीक्षक सचिन पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी (निफाड विभाग) माधव रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली लासलगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे यांचे सह लासलगावचे पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पानसरे, पोहवा मधुकर उंबरे यांनी अटक केली.या आरोपीस निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर जी वाघमारे यांचे समोर तपास अधिकारी राजेंद्र पानसरे यांनी हजर केले असता जिल्हा सहाय्यक सरकारी अभियोक्ता अँड रामनाथ. बी. शिंदे यांनी युक्तिवाद केल्यानंतर २८ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडीचे आदेश दिले आहेत.