‘त्या’ आरोग्य अधिकार्‍याची पत्रकारांनी मांडली छगन भुजबळ यांच्याकडे कैफियत

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना संदर्भात पत्रकारांशी अरेरावी करणाऱ्या निफाड तालुका वैद्यकीय अधिकाऱी डॉ नवलसिंग चव्हाण यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आली असून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तातडीने या संदर्भात कारवाई करावी असे निर्देश नाशिकचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांनी दिले आहेत.

बुधवारी लासलगाव प्रेस क्लबचे सदस्य यांनी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शहरात आढळल्याने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ नवलसिंग चव्हाण यांना दूरध्वनीवर संपर्क झाल्याने त्यांनी अरेरावी करत हिम्मत असेल तर बाहेर येण्याचे आव्हान दिले होते. गुरुवारी दुपारी राज्याचे अन्न नागरी व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लासलगाव शहराची पाहणी केली त्यावेळी लासलगाव प्रेस क्लबच्या सर्व सदस्यांनी छगन भुजबळ यांची भेट घेऊन झालेल्या प्रकाराची कैफियत मांडली.

लासलगाव ग्रामपंचायतीच्या प्रांगणात उपसरपंच जयदत्त होळकर व विविध अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत छगन भुजबळ यांना घटनेची माहिती देण्यात आली तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याने अशाप्रकारे वागणूक देणे अत्यंत चुकीचे आहे. इतर सहकाऱ्यांकडून अनेक तक्रारी या डॉक्टरां बाबत आल्या असल्याने ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे भुजबळ म्हणाले. इतक्या वर्षापासून ते निफाड तालुक्यात काम करत आहे जर त्यांचे काम चांगले असेल तर मालेगाव सारख्या ठिकाणी अशा अधिकाऱ्यांची गरज असल्याचे पत्रकार यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.

या प्रसंगी उपसरपंच निफाडचे उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार दीपक पाटील, उपसरपंच जयदत्त होळकर , निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ साहेबराव गावले, ग्राम विकास अधिकारी शरद पाटील, तलाठी सागर शिर्के, पिंपळगाव नजीक ग्रामसेवक शशिकांत कदम ग्रामसेवक योगेश बत्तीसे यांच्यासह अधिकारी व लासलगाव प्रेस क्लबचे सदस्य उपस्थित होते.