लासलगाव : रानवड सहकारी साखर कारखाना सुरू व्हावे यासाठी राज्यकृषी मंत्री दादा भुसे यांना निवेदन

लासलगाव : वार्ताहर –  निफाड तालुक्याचे वैभव असणारा रानवड सहकारी साखर कारखाना सुरू करणेबाबत लासलगाव भेटीवर आलेल्या राज्य कृषी मंत्री दादा भुसे यांना रासाका बचाव कृती समिती कडून निवेदन देण्यात आले.यावेळी नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, निफाड तालुका पंचायत समितीचे उपसभापती शिवा सुराशे,उत्तम वाघ ऊपस्थीत होते

निफाड तालुक्याचे वैभव असणारा रानवड सहकारी साखर कारखाना मागील अनेक दिवसांपासून बंद असून सदरचा कारखाना सुरु होणे हे निफाड तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने व तालुक्यातील ऊस शेतकरी वर्गाच्या व सदर कारखान्यात अनेक वर्षांपासून कामगार म्हणून काम करणाऱ्या कामगारच्या दृष्टीने अत्यंत महत्बाचा विषय असून रासका सुरु करणे, हेच मुख्य उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन रासाका बचाव कृती समिती मार्फत राज्य कृषी मंत्री महाराष्ट्र शासन या नात्याने निफाड तालुक्याचे गतवैभव परत मिळवून देण्याच्या दृष्टीने आपण शासन स्तरावर सदरचा कारखाना त्वरित चालू करण्याविषयी सुरु असणाच्या प्रक्रियेत लक्ष घालून सदरचा विषय शासन स्तरावरून त्वरीत मार्गी लावण्यास सहकार्य करावे असे रासाका बचाव कृती समिती कडून निवेदन।राज्य कृषी मंत्री दादा भुसे यांना देण्यात आले

या निवेदनावर नामदेव शिंदे,विशाल जाधव ,दत्तू मुरकुटे, दत्ता आरोटे ,शंकर दरेकर, दिपक बडघुले, मनोज जाधव, हेमंत सानप ,खंडू बोरगुडे ,योगेश वाघ स्वाक्षऱ्या आहेत