लासलगावचा कांदा ‘कोन बनेगा करोडपती’वर

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – आशिया खंडातील अग्रेसर असलेल्या लासलगाव बाजारपेठेतील कांद्याला मानांकन मिळाल्यानंतर आता कोन बनेगा करोडपती या शोमध्ये अमिताभ बच्चन यांनी लासलगावच्या कांद्यावरील प्रश्न विचारल्याने कांद्याच्या माध्यमातून लासलगाव शहराला बहुमानाचा तुरा मिळाला आहे.

कांद्याच्या भावामध्ये चढ-उतार झाला, की गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत कांद्याची संपूर्ण देशभरात चर्चा होते. गुरुवारी (दि. १२ नोव्हेंबर) कोण बनेगा करोडपतीच्या १२ व्या सीझनमध्ये “लासलगाव का प्याज किस राज्य का है” यावर प्रश्न उपस्थित केला होता. कधी शेतकरी ते कधी ग्राहकांना रडविणारा कांद्यावर केबीसीमध्ये उल्लेख झाल्याने लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात आले आहे.

दीपावलीनिमित्त गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यासह लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती बंद आहे. मात्र, बाजार समिती बंद असतानाही लासलगावच्या कांद्याचा नामोल्लेख कोन बनेगा करोडपतीच्या शोमध्ये झाल्याने लासलगावकरांचा आनंद द्विगुणित झाला आहे.