लासलगाव : समीर देवडेंच्या शोध निबंधाची आंतरराष्ट्रीय परिषदेत सादरीकरणासाठी निवड

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन (राकेश बोरा) – लासलगाव शिक्षण सहायक मंडळ संचलित जिजामाता प्राथमिक शाळा, लासलगाव येथील उपशिक्षक माय स्पोकन इंग्लिश बुकचे लेखक समीर देवडे यांच्या शोध निबंधाची हैद्राबाद येथे संपन्न होनाऱ्या आंतरराष्ट्रीय इंग्रजी विषयाच्या परिषदेसाठी निवड झाली आहे. ऑल इंडिया इंग्लिश टिचर नेटवर्क, ब्रिटिश कौन्सिल व अमेरिकन दुतावास यांचे संयुक्त विद्यमाने पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद हैद्राबाद येथे दिनांक 10,11 जानेवारी रोजी संपन्न होत आहे. 45 देशातील इंग्रजी विषयाचे प्रतिनीधी सहभागी होत आहे.

लासलगाव येथील समीर देवडे यांनी इंग्रजी विषयाच्या भाषिक कौशल्यांचा विकास यावर आधारीत शोधनिंबध लिहिलेला आहे. सदर निबंध ते आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर करनार आहेत. या अगोदर देखील दोन आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी सहभाग घेतला आहे. माय स्पोकन इंग्लिश बुक या पुस्तकाच्या दोन आवृती प्रकाशित झाल्या आहेत. इंग्रजी विषय राज्य मार्गदर्शक म्हणून ते महाराष्ट्र शासनासाठी काम करतात. इंग्रजी विषयात विविध उपक्रम त्यांनी आजवर राबविले आहेत. राज्य शासनाच्या तेजस सक्सेस स्टोरी या पुस्तकात त्यांचे इंग्रजी विषयाचे उपक्रम प्रकाशित झालेले आहेत.

त्यांच्या या निवडी बद्दल नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी एस.भुवनेश्वरी, जिल्हा शिक्षणअधिकारी वैशाली झनकर, डायटचे इंग्रजी विभाग प्रमुख योगेश सोनवणे, तेजस प्रकल्पाचे समन्वयक अशोक चव्हाण तसेच संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सचिव संजय पाटील, उपाध्यक्ष निवृत्ती गायकर संचालक शंतनु पाटील, पं.सं.सदस्या रंजनाताई पाटील, संचालिका नीताताई पाटील व सर्व संचालक मंडळ व संस्थेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील, शाळेचे मुख्याध्यापक अनिस काझी व सर्व सहकारी शिक्षकांनी समीर देवडे यांचे अभिनंदन केले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/