लासलगाव आगाराच्या लालपरीला 2 महिन्यांपासून ‘कोरोना’मुळे 3.5 कोटींचा फटका

लासलगाव – कोरोना ची आर्थिक झळ लासलगाव आगाराच्या लालपरीला ही बसलेली आहे काही प्रमाणात बसेस सुरू झाल्यानंतरही प्रवाशांची मात्र या बस कडे पाठ फिरविल्याने या बसला प्रवाशांची प्रतीक्षा कायम आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून बस सेवा बंद असल्यामुळे लासलगाव आगाराला साधारणतः साडेतीन कोटी रुपयांचा फटका बसला आहे

गेल्या दोन महिन्यांपासून लासलगाव आगारांमध्ये बसेस उभ्या आहे लासलगाव बस आगारातून 288 फेऱ्या द्वारे दररोज साधारणत पंधरा हजार किलोमीटर अंतर कापून प्रवाशांना सेवा दिली जाते यातून लासलगाव बस आगाराला दररोज पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते. 22 मार्च पासून लासलगाव आगारातील बस सेवा बंद होत्या . गेल्या काही दिवसांपासून लासलगाव आगारातून काही भागात बस सेवा सुरू झाली आहे मात्र प्रवाशांनी पाठ फिरविल्याने महामंडळाचे आर्थिक नुकसान होत आहे.

लासलगाव बस आगाराच्या वतीने गेल्या आठ दिवसांपासून चांदवड ,मनमाड, निफाड, येवला, सिन्नर या गावाकरिता बस सेवा सुरू आहे एका बाकावर एक प्रवासी सेनीटायझर चा वापर मास्कसह प्रवाशी या अटींवर बस सेवा सुरू करण्यात आल्याची माहिती आगारप्रमुख समर्थ शेळके यांनी दिली आहे